नागपूर, दि.24 : पुराभिलेख संचालनालयातर्फे मोडीलिपी प्रशिक्षण 7 ते 16 सप्टेबर या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर येथील वि.भि. कोलते वाचनालयात दररोज दुपारी 1 ते 3 या वेळात प्रशिक्षण देण्यात येईल.
प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची 100 गुणांची परीक्षा घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. इच्छूकांनी आपल्या नावाची नोंद विदर्भ पुरालेखागार संकलक फि.र.पाठक, लिंग्वीस्टीक विभागाचे विभाग प्रमुख शैलेंद्र कुमार यांच्याकडे करावी. अथवा अधिक माहितीकरिता पुराभिलेख संचालनालय, एलफिन्स्टन महाविद्यालय इमारत, मुंबई या पत्त्यावर किंवा 22843971,22844268 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
प्रशिक्षणाचा शासकीय कर्मचारी, इतिहासाचे अभ्यासक तसेच इतिहासप्रेमी नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पुराभिलेख संचालालयाचे संचालक सुशील गर्जे यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment