Thursday, 24 August 2017

एक लाखाची सुगंधीत तंबाखू, साहित्य जप्त

                     अन्न व औषधी प्रशासन विभागाची कारवाई
        नागपूर, दि.24 : यशोधरा पोलिस स्टेशनतंर्गत येणाऱ्या वांजरा वस्ती येथील सुगंधीत तंबाखू बनविणाऱ्या कारखान्यावर अन्न व औषधी प्रशासनाने धाड टाकून  1 लाख 900 रुपयांचा साठा जप्त केला.
             वांजरा वस्तीत सुगंधीत तंबाखू बनविण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषधी विभागाला मिळाली. या माहितीच्या आधारे सहाय्यक  पोलिस उपनिरीक्षक मधुकर शिर्के यांच्या पथकाने धाड टाकली. यावेळी कारखान्यात सुगंधीत तंबाखू बनिण्याचे काम सुरू होते. त्यानंतर अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातंर्गत तंबाखूची तपासणी करून 30 हजार 900 रुपयांचा सुगंधीत तंबाखू  व बनविण्याकरिता लागणारे  70 हजार रूपये किमतीचे साहित्य असा 1 लाख 900 रुपयांचा साठा जप्त केला. तसेच कारखान्याला सिलबंद करण्यात आले.
       कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त मिलिंद देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी विनोद धवड व प्रफुल्ल टोपले यांनी केली.
****   

No comments:

Post a Comment