नागपूर, दि.24 : येथील मध्यवर्ती कारागृहातील बंदी यादव नथुबा कोहचाडेच्या मृत्यूची चौकशी उपविभागीय दंडाधिकारी शिरीष पांडे यांच्यामार्फत करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी यांनी दिले आहे.
यादव नथुबा कोहचाडेचा 10 ऑगस्ट 2017 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. मृत्यू होण्याची कारणे व परिस्थिती तसेच मृतकाच्या मृत्यूस कारणीभूत असलेली इतर संयुक्तीक कारणांचा अहवाल सादर करणे आवश्यक आहे. अथवा या घटनेची प्रत्यक्ष माहिती असणाऱ्या आणि चौकशीमध्ये भाग घेऊ इच्छूकांनी सर्व माहिती आणि सत्य परिस्थितीबाबत आपले लेखी निवेदन शपथपत्रासह तहसील कार्यालय, नागपूर येथील खोली क्र.1 मध्ये 22 सप्टेबरपूर्वी सादर करावी, असे कळविले आहे.
****
No comments:
Post a Comment