Monday, 4 September 2017

आधार नोंदणीसाठी मुंबई शहर जिल्ह्यात 9 व 10 सप्टेंबर रोजी विशेष मोहिम


          मुंबईदि. 04 : मुंबई शहर जिल्ह्यातील नागरीकांसाठी आधार नोंदणीकरीता जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहओल्ड कस्टम हाऊसशहीद भगतसिंग मार्गफोर्टमुंबईयेथे दि. 9 आणि 10 सप्टेंबर रोजी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहेअशी माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत माहिती दिली आहे.
          आधार नोंदणी न केलेल्या नागरिकांनी जन्मतारखेचा पुरावा म्हणून जन्माचा दाखलाशाळा सोडल्याचा दाखलामहाविद्यालय सोडल्याचा दाखलापॅन कार्डमतदान ओळखपत्र यापैकी कोणतेही एका तसेच रहिवासाचा पुरावा म्हणून बँकेचे पासबुकशिधावाटप पत्रिकादूरध्वनी देयकविज देयक तसेच इतर पुराव्यांपैकी कोणत्याही एक पुराव्याच्या मुळ प्रतीसह व छायांकित प्रती स्वयंसाक्षांकित करुन उपस्थित रहावे. आधार नोंदणी न केलेल्या नागरिकांनी आधार नोंदणीच्या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावाअसे आवाहन करण्यात आले आहे.
००००

No comments:

Post a Comment