Monday, 30 October 2017

विद्यार्थ्यांनी अर्ज 31 ऑक्टोबरपूर्वी अपलोड करावेत


नागपूरदि30 :  विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवार्गामधील पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, निर्वाह भत्ता व इतर अनुज्ञेय फीचा लाभ मंजुरीसाठी लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरण योजना (डीबीटी) लागू करण्यात आली आहे.
विजा, भज, इमाव व विमाप्र यांना शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, निर्वाह भत्ता व इतर अनुज्ञेय फीचा लाभ मिळण्यासाठी वित्तीय वर्ष 2017-18 पासूनhttp://mahabdt.gov.in हे संकेतस्थळ समाज कल्याण विभागाने विकसित केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज, योजनेचे निकष, अटी-शर्ती इ. माहिती वरील संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली असून लाभार्थ्यांनी त्यांचे अर्ज दिनांक 31 ऑक्टोबर 2017 पूर्वी अपलोड करावे. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाह समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी केले आहे.
** * * * **

No comments:

Post a Comment