Thursday, 5 October 2017

मेजर विनित कुमार पी हेगडे यांना अनुज्ञेय रक्कम मंजूर

मुंबईदि. 5 :महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेअंतर्गत सैन्यातील 14 प्रकारच्या शौर्यपदक/सेवापदक धारकांना शासकीय अनुदान राज्य शासनामार्फत देण्यात येते. ठाण्याचे आयसी ६८६५१ पी मेजर विनित कुमार पी  यांना राज्य शासनामार्फत देण्यात येणारी अनुज्ञेय रक्कम मंजूर करण्यात आली आहे.
आयसी ६८६५१ मेजर विनित कुमार पी हेगडे यांना राष्ट्रपती सचिवालयामार्फत सेना  पदक प्रदान करण्यात आले आहे. आयसी ६८६५१ पी मेजर विनित कुमार पी यांना एकूण ५,५०,००० रुपये इतके अनुदान देण्यात येणार असून यापैकी महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेअंतर्गत अनुज्ञेय ठरविलेल्या रकमेपैकी 75 टक्के रक्कम म्हणजेच ४,१२,५०० रुपये शासकीय अनुदानातून आणि 25 टक्के रक्कम म्हणजे १,३७,५०० रुपये मुख्यमंत्री सहायता (कारगिल) निधीतून देण्यात येणार आहेत. ही रक्कम ठाणे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्यामार्फत देण्यात येणार आहे.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करणत आला असून त्याचा संकेताक २०१७०९१४१६४२१२१९०७असा आहे.

No comments:

Post a Comment