मुंबई, दि. ५ : महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेअंतर्गत सैन्यातील 14 प्रकारच्या शौर्यपदक/सेवापदक धारकांना शासकीय अनुदान राज्य शासनामार्फत देण्यात येते. पुण्याचे आयसी - ३८७५० एच ले .जनरल मनोज मुकुंद नरवणे यांना राज्य शासनामार्फत देण्यात येणारी अनुज्ञेय रक्कम मंजूर करण्यात आली आहे.
आयसी ३८७५० एच ले. जनरल मनोज मुकुंद नरवणे यांना राष्ट्रपती सचिवालयामार्फत अती विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले आहे. आयसी ३८७५० एच ले. जनरल मनोज मुकुंद नरवणे यांना एकूण ६०,००० रुपये इतके अनुदान देण्यात येणार आहे. यापैकी महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेअंतर्गत अनुज्ञेय ठरविलेल्या रकमेपैकी 75 टक्के रक्कम म्हणजे ४५,००० रुपये शासकीय अनुदानातून आणि 25 टक्के रक्कम म्हणजे १५,००० रुपये मुख्यमंत्री सहायता (कारगिल) निधीतून देण्यात येणार आहेत. ही रक्कम पुणे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्यामार्फत देण्यात येईल.
हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.inया संकेतस्थळावर उपलब्ध करणत आला असून त्याचा संकेताक 20170914636160107 असा आहे.
0000
No comments:
Post a Comment