
मुंबई, दि. 3 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास ' कार्यक्रमात राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांची दि. 4 आणि 5 ऑक्टोबरला आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत मुलाखत प्रसारित होणार आहे.
'नांदेड-वाघाळा महानगरपालिका आणि राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकांची तयारी' हा मुलाखतीचा विषय आहे. ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
उमेदवारांसाठी नवी खर्च मर्यादा, मतदान जागृती, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, नांदेड-वाघाळा महानगरपालिकेत व्हीव्हीपॅटचा प्रायोगिक तत्वांवरील वापर आदींबाबत श्री. सहारिया यांनी या मुलाखतीत माहिती दिली आहे.
००००
No comments:
Post a Comment