Thursday, 5 October 2017

जर्मन दिनानिमित्त आयोजित प्रदर्शनाचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते उद्घाटन


          मुंबई, दि. 5 : जर्मन दिनानिमित्ताने महालक्ष्मी रेसकोर्सवर आयोजित प्रदर्शनाचे काल उद्योगमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. जर्मन आणि भारतातील औद्योगिकशैक्षणिकक्रडा संस्कृतचे आदान प्रदान व्हावे तसेच भारत-जर्मन संबध दृढ व्हावेत यासाठी, आयोजित  प्रदर्शनाला  उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी मुंबई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता उपस्थित होते.
चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात जर्मन देशातील संस्कृतचे दर्शन घडविणारी सजावट करण्यात आली आहे. ऑटोमोबाईल, पर्यटन, शिक्षण यासह इतर उत्पादन व सेवांची माहिती देणारे स्टॉल्स या ठिकाणी लावण्यात आले आहेत.

क्षणचित्रे
o   जर्मन ब्रॅण्डच्या बहुतेक गाड्याच्या स्पेअर पार्ट्सचे उत्पादन भारतात होते. पुण्यातील चाकण प्रकल्पात असेंबल केलेल्या पोलो, व्हेंटो या सारख्या सुमारे एक लक्ष कार एकट्या मॅक्सीकोत दरवर्षी निर्यात केल्या जातात.
o   बिएमडब्ल्यूच्या नव्या कार तसेच बाईक या महोत्सवाचे आकर्षण आहे. जगभरात विकल्या जाणाऱ्या सुमारे 36 लाख रुपये किंमतीच्या या बाईकसोबत सेल्फी काढण्यासाठी पर्यटक गर्दी करीत होते.
o   स्टुटगार्ड हे शहर ग्रीनसीटी म्हणून ओळखले जाते. शैक्षणिक संधीमुळे या शहराला एज्युकेशन हब म्हटले जाते. राज्यातील सातारा शहर आणि जर्मनीतील स्टुटगार्ड हे व्टिन सिटी म्हणून विकसीत करण्यात येणार आहे. कौशल्य विकास प्रशिक्षणातही जर्मन शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. शिक्षणाच्या बाबतीत भारतीय  युवक जर्मनीस पंसती देत आहेत.
o   जर्मन देशातील उत्तम प्रतीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या जेवणाचा आस्वाद जर्मन बॅण्डच्या संगीतासोबत घेता येतो.
o   ऑनलाईन तिकीट बुक करुन या प्रदर्शनास भेट देता येते.

No comments:

Post a Comment