मुंबई, दि.०५ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या 'दिलखुलास' कार्यक्रमात महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी यांची 'महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची यशस्वी वाटचाल' या विषयावर मुलाखत प्रसारित होणार आहे.
ही मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून दि. ०६ व ७ ऑक्टोबर २०१७ रोजी सकाळी ७.२५ ते ८.४० या वेळेत प्रसारित होईल. ही मुलाखत निवेदिका शिबानी जोशी यांनी घेतली आहे.
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची ध्येय धोरणे, केंद्र व राज्य सरकार यांच्या समन्वयाने सुरू असलेली रिजनल कनेक्टीव्हीटी स्कीम तसेच आगामी कालावधीतील उपक्रमांबाबत सविस्तर माहिती 'दिलखुलास'कार्यक्रमात श्री. काकाणी यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment