7 जानेवारी 2018 रोजी होणार प्रवेश परीक्षा
मुंबई दि. 26 : सैनिक शाळा सातारा येथील सन 2018-19 च्या सत्रातील ६ वीआणि ९ वीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून प्रवेशासाठी ठराविकनमुन्यातील
अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर अर्ज 30नोव्हेंबर 2017पर्यंत ऑनलाईन पध्दतीने भरावयाचे आहेत. या
प्रवेशांसाठी 7 जानेवारी 2018 रोजी प्रवेश परिक्षा होणार आहे. प्रवेश परीक्षा ओ.एम.आर. पध्दतीने घेण्यात
येणार असून ज्यात विदयार्थ्यांना बहुपर्यायी उत्तरांमधून एक बरोबर उत्तर निवडायचे
आहे.
ऑनलाईन अर्ज भण्यासाठी www.sainiksatara.orgया संकेतस्थळाला भेट द्यावी.ऑनलाईन
अर्ज भरताना आवश्यक त्या रकमेचा डिमांड ड्राफ्ट आपल्यासोबतठेवावा. ऑनलाईनवर
पूर्णपणे भरलेल्या प्रवेश अर्जाची प्रिन्टेड प्रत वडिमांड ड्राफ्ट आणि सोबतची
जोडपत्रे सैनिक शाळा साताराच्या कार्यालयात
पोहोचवण्याची अंतिम तारीख 5 डिसेंबर 2017 रोजी संध्याकाळी ५वाजेपर्यंत असेल. इयत्ता सहावीतील प्रवेशासाठी उमेदवार 2 जुलै 2007 ते 1 जुलै 2008 (दोन्ही दिवस धरुन)
या दरम्यान जन्मलेला असावा. इयत्ता नववीतील प्रवेशासाठीउमेदवार 2 जुलै 2004 ते 1 जुलै 2005 (दोन्ही दिवस धरुन)
या दरम्यानजन्मलेला असावा व सध्या मान्यताप्राप्त शाळेत इयत्ता आठवीमध्ये
शिकतअसावा. इयत्ता नववीच्या प्रवेशासाठी प्रश्नपत्रिका फक्त इंग्रजीमधूनअसतील.
इयत्ता सहावीसाठी 71 जागांसाठी प्रवेश दिला जाईल, तर नववीतीलप्रवेशासाठी 5 जागा उपलब्ध असतील.
सहावी आणि नववीतील 15 टक्के जागा अनुसुचित जाती, 7.5 टक्के जागा अनुसुचित जमाती, तर 25 टक्के जागा सैनिक
सेवेतील आजी व माजी कर्मचाऱ्यांची मुले याच्यासाठी राखीव (अ. ज. व अ. जा. यांच्या
राखीव जागा सोडून) असतील.
सामान्यवर्ग, संरक्षण दल, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग,विशेष मागासवर्गातील उमेदवारांसाठी 400 रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात
येईल, तर अनुसुचित जाती व अनुसुचित जमातीमधील उमेदवारांसाठी 250 रुपयेप्रवेश शुल्क
आकारण्यात येईल. यासाठी मुलांच्या जातीच्या दाखल्याची झेरॉक्स प्रत जोडणे बंधनकारक
आहे. सैनिक शाळा सातारा संरक्षण मंत्रालय
आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त अधिपत्याखाली
१९६१ साली स्थापन झाली
आहे.
००००
No comments:
Post a Comment