Thursday, 26 October 2017

'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर

मुंबई,दि २६: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात  पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार, दिनांक २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० ते ८.०० या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत निवेदक संजय भुस्कुटे यांनी घेतली आहे.
राज्यात दुधाचे उत्पादन आणि दुधाळ पशूंच्या दुग्धोत्पादनात भरीव वाढ तसेच मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी पदुम विभागामार्फत अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. या धोरणाबाबत तसेच पशुसंवर्धन,दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय या विभागाविषयी सविस्तर माहिती पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून दिली आहे. 

0000

No comments:

Post a Comment