Tuesday, 3 October 2017

मतदार याद्यांचा विशेष पुनर्रीक्षण कार्यक्रमाला प्रारंभ


        नागपूर,दि. 03 :  भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, नागपूर जिल्ह्यात 1 जानेवारी 2018 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनर्रीक्षण कार्यक्रमाला आजपासून प्रारंभ झाला आहे,अशी माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली.
            कार्यक्रमानुसार 3 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत मतदार यादीतील त्रुटी व उणिवांचा शोध घेण्यात येणार आहे. तसेच मतदारांनी त्यांचे दावे व हरकती संबंधित विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसील कार्यालय किंवा मतदार मदत केंद्रात सर्व आवश्यक कागदपत्रासह उपरोक्त मुदतीत स्विकारण्यात येणार आहे.
            मतदार नोंदणी कार्यक्रमामध्ये पात्र मतदारांची मतदार यादीमध्ये नोंदणी करण्यासाठी 8 ऑक्टोबर व 22 ऑक्टोबर या दोन सुटीच्या दिवशी विशेष मोहीत राबविली जाणार आहे. त्याकरिता जिल्ह्यातील सर्व मतदार केंद्रावर मतदार केंद्रस्तरीय  अधिकारी (बीएलओ) उपस्थित राहणार आहे. या दोन दिवशी मतदारांनी आपले दावे व हरकती नमुना 6 (नवीन मतदारांची नाव नोंदणी) नमुना 6 अ (NRI Voters), नमुना 7 (नाव वगळणी), नमुना 8 (नावात दुरुस्ती), नमुना 8 अ (विधानसभा मतदार संघाअंतर्गत पत्त्यातील बदल) संबंधीत मतदार केंद्रावर आवश्यक कागदपत्रासह स्विकारण्यात येईल.
            भारत निवडणूक आयोगाचे No Voter to be left behind  या घोषवाक्यानुसार जास्तीत - जास्त मतदारांनी नोंदणी करावी तसेच विशेष  संक्षिप्त पुनर्रीक्षण कार्यक्रम मोहिमेचा मतदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे  यांनी केले.
******


No comments:

Post a Comment