मुंबई, दि. 5 : ग्रीन केमिस्ट्री फाउंडेशनमार्फत आयोजित इंडस्ट्रीअल ग्रीन केमिस्ट्री वर्ल्ड पुरस्कार वितरण सोहळा उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत पार पडला. पर्यावरणपूरक कार्यक्रमांसाठी शासन नेहमी सहकार्य करेल, कंपन्यांनी पर्यावरण वाचविण्यासाठी नेहमी सकारात्मक कार्य करावे असे, आवाहन उद्योगमंत्री श्री. देसाई यांनी केले.
पवई येथील हॉटेल रामदा येथे ग्रीन केमिस्ट्री फौंडेशनतर्फे इंडस्ट्रीअल ग्रीन केमिस्ट्री वर्ल्ड 2017 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
मंत्री श्री. देसाई म्हणाले, पर्यावरणाचा ह्रास थांबविण्यासाठी शासनातर्फे पूर्ण प्रयत्न केले जातात. केमिकल कंपन्यांनी यासाठी सहकार्य करावे,पर्यावरणपूरक कार्यक्रमांच्या आयोजनासाठी पुढाकार घ्यावा, पर्यावरणाची आता निगा राखणे ही भविष्याची गरज आहे.स्टॉक होल्डरला ग्रीन केमिस्ट्री फाउंडेशनने व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले.
या प्रसंगी एसइआरबीचे सचिव डॉ. राजीव शर्मा, डॉ. अजय देशपांडे, जर्मनीच्या डॉ. बेनीट, डॉ. डेव्हीन आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment