मुंबई, दि. 5 : भारतीय परराष्ट्र सेवेत निवड झालेल्या परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पायाभूत सुविधा, उद्योग, कृषी या क्षेत्रातील गुंतवणूक व त्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाची भूमिका या विषयावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.
भारतीय परराष्ट्र सेवेत निवड होऊन आता परिविक्षाधीन कालावधीत असलेल्या चार अधिकाऱ्यांनी आज वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी अपर मुख्य सचिव मुकेश खुल्लर उपस्थित होते. जागतिक पातळीवर देशाचे तसेच महाराष्ट्राचे वाढत असलेले महत्त्व आणि त्या योगे येणारी गुंतवणूक या विषयावर यावेळी चर्चा झाली.
विविध देशातून राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. ही गुंतवणूक आणण्यासाठी प्रक्रिया आखावी लागणार आहे. यामध्ये परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांची महत्वाची भूमिका असणार आहे, असे मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment