मुंबई, दि. 5 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र ' कार्यक्रमात ‘वस्तू व सेवा कर' या विषयावर राज्याचे वस्तू व सेवा कर आयुक्त राजीव जलोटा यांची मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून 6 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7.30 ते 8 या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत निवेदिका मनाली दीक्षित यांनी घेतली आहे.
वस्तू व सेवाकर पध्दतीमध्ये व्यावसायिकांचे स्थित्यंतर, जीएसटीआर -1, 2 आणि 3 सादर करण्यास विलंब झाल्यास त्याबाबतच्या दंडाच्या तरतूदी शिथीलक्षम आहेत का, आदी प्रश्नांची उत्तरे श्री. जलोटा यांनी 'जय महाराष्ट्र' या कार्यक्रमातून दिली आहेत.
No comments:
Post a Comment