Thursday 30 November 2017

एचआयव्ही प्रतिबंधासाठी लोकचळवळीतून एकत्रित काम करा - डॉ. दीपक सावंत






मुंबई, दि. 30 : एचआयव्ही संसर्गाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना शासन व अशासकीय संस्थांना यश प्राप्त झाले आहे. एचआयव्ही प्रतिबंधासाठी लोकचळवळीतून एकत्रित काम करणे गरजेचे आहे. राज्यात गुणवत्तापूर्ण सेवांवर लोकांचा असलेला दृढ विश्वास व जनसहभागामुळे महाराष्ट्र राज्य नेहमीच राष्ट्रीय स्तरावर प्रशंसेस पात्र ठरेल, असा विश्वास आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी व्यक्त केला.
जागतिक एड्स दिनानिमित्त मंत्रालयात आज सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महाराष्ट्र एड्स नियंत्रण संस्थेच्यावतीने राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यासआरोग्य सेवेचे संचालक डॉ.सतिश पवारस्त्री रोग तज्ज्ञ डॉ. रेखा डावरयुएसएआयडीच्या एचआयव्ही डिव्हीजनच्या प्रमुख सेरा हैदारे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालक ज्योती अंबेकर यांनी केले.
डॉ. सावंत म्हणालेएचआयव्ही रूग्णांच्या वाढत्या प्रमाणाला आळा घालण्यासाठीच्या यंत्रणांना शासनाने गती दिली असूनत्यास यश प्राप्त झाले आहे. एचआयव्हीसह जगणा-या व्यक्तींना जीवनाविषयी नेहमी सकारात्मक विचार करून आरोग्यपूर्ण जीवनपद्धतीचा अवलंब करण्यासाठी राज्यभर एआरटी केंद्र सुरू आहेत. मुंबई व मुंबई उपनगरे वगळता राज्यातील 34 जिल्ह्यांत ५९५ एकात्मिक समुपदेशन व तपासणी केंद्रे असूनयेथे समुपदेशन व मोफत औषधे दिली जातात. सामान्य रूग्णालयातील जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष यांच्यामार्फत एक खिडकी योजनेतून गरजू रूग्णांचे अर्ज स्विकारून ते शासकीय लाभासाठी सादर करण्यात येतात.
रूग्णांना व गरजूंना माहिती व मार्गदर्शन मिळावे यासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन १०९७ ही टोल फ्री सेवा सुरू करण्यात आली असल्याची माहिती डॉ. सावंत यांनी दिली. एड्स नियंत्रण कार्यक्रम हा व्यक्तीगत उपक्रम नसूनसामाजिक चळवळ आहे. एड्सचा प्रादुर्भाव कमी करून निर्मूलन करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकांचा सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहनही डॉ. सावंत यांनी केले.
कार्यक्रमादरम्यान मातेपासून नवजात बालकाला एड्सपासून मुक्त करण्याचे कार्य यशस्वीरित्या करणा-या ज्येष्ठ स्त्रिरोग तज्ञ डॉ. रेखा डावर यांचा डॉ. सावंत यांनी सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी ठाणे शासकीय रुग्णालयाच्यावतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. अधिकारी आणि कर्मचारी यांनी त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यु.एस.एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट अंतर्गत कार्यरत असलेल्या केएचपीटी आणि लिंकएड या अशासकीय संस्थांनी समुपदेशन करणा-यांना मार्गदर्शन मिळावे यासाठी एक पाऊल जीवनाकडे असा संदेश देणारे फ्लिप कार्डऑडीओ जिंगलजनजागृती संदर्भात पोस्टर यांचे प्रकाशन तसेच आरोग्य केंद्रात हवेतून पसरणा-या जंतूपासून संरक्षण व्हावे यासाठी तयार करण्यात आलेल्या फिल्टरचे उद्घाटन आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
००००

No comments:

Post a Comment