Wednesday, 1 November 2017

महादेव जानकर झाले लोकराज्यचे वर्गणीदार

मुंबई, दि. 1:माहिती व जनसंपर्क महासंचालय निर्मित शासनाच्या 3 वर्षपूर्तीनिमित्त 'होय हे माझं सरकार' या मंत्रालयात आयोजित प्रदर्शनास पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी भेट दिली.
प्रदर्शनातील फलकांचे त्यांनी बारकाईने वाचन करून योजनांची माहिती जाणून घेतली. या प्रदर्शनामुळे अनेक योजनांची माहिती मिळाली असे सांगून मंत्रालयात कामानिमित्त येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना योजनांची चांगल्या प्रकारे माहिती मिळेल. नागरिक योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित होतील, असे ते म्हणाले.
यावेळी शासनाचे मुखपत्र असलेले महासंचालनालयाचे प्रकाशन लोकराज्य मासिक त्यांनी चाळले. या मासिकाच्या मराठी, इंग्रजी, गुजराती प्रतीची त्यांनी खरेदी केली. तसेच मासिकाची एक वर्षाची वर्गणी भरून ते लोकराज्यचे सभासद झाले. लोकराज्य हे शासनाचे उत्कृष्ट प्रकाशन असल्याचे ते म्हणाले.

००००

No comments:

Post a Comment