नागपूर दि. 2 :- ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे आरोग्य विभागामार्फत मौखिक आरोग्य तपासणी मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी आरोग्य उपसंचालक नागपूर, सर्वोपचार रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार, कळमेश्वर कार्यालय अधीक्षक उपस्थित होते.
मौखिक आरोग्याबाबत स्वच्छ मुख, अस्वच्छ मुख, कर्करोगाची पूर्व लक्षणे याबाबत आरोग्य उपसंचालक यांनी यावेळी माहिती दिली. तसेच शिबीरामध्ये 30 वर्षावरील व्यक्तींची मौखिक आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment