मुंबई दि. 17 :सातव्या अखिल भारतीय संत साहित्य संमेलनाचा आढावा घेणारा ‘संतांची मांदियाळी’ हा लघुपट झी 24 तास या वृत्तवाहिनीवरुन उद्या रविवार, दि. 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.30 ते 10 या
वेळेत प्रसारित होणार आहे.
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोर येथे दि. 15 ते 17 फेब्रुवारी असे तीन दिवस झालेल्या या संत साहित्य संमेलनामुळे अर्जुनी मोर
संतमय झाले होते. समाजात समता, ऐक्य प्रस्थापित करण्याच्या
उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात सादर झालेल्या विविध
कार्यक्रमांचा आढावा लघुपटातून घेण्यात आला आहे. नागरिकांनी हा लघुपट अवश्य पहावा, असे आवाहन सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारित डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता
प्रतिष्ठानने केले आहे.
0000
No comments:
Post a Comment