Wednesday 28 February 2018

नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील जैव वैद्यकीय कचऱ्यांची विल्हेवाट लावण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            मुंबईदि. 28 : नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरातील जैव वैद्यकीय कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्याबाबतच्या तक्रारीच्या अनुषंगाने अधिवेशन संपताच सव्र सर्व संबंधितांसह या परिसराची पाहणी करण्यात येईल व त्यानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईलअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत सांगितले.
            याबाबत सदस्य नागोराव गाणारप्रा. अनिल सोलेगिरीशचंद्र व्यास यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.
            या महाविद्यालय परिसरातील 200 किलो जैव वैद्यकीय कचरा उचलला जातो. यासाठी लागणारा खर्च संबंधितांना दिला जातो. नियमाप्रमाणे संबंधित संस्थेने कचऱ्यांची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. तक्रारीच्या अनुषंगाने या ठिकाणी भेट देऊन आवश्यक त्या सधारणा करण्यात येतीलअसे वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितले.
000

No comments:

Post a Comment