Monday, 19 February 2018

शिवनेरी गडावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न





पुणे दि. 19 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी गडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन केले.
यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, शिक्षण मंत्री विनोद तावडे, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, आमदार शरद सोनावणे, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी सौरभ राव, जिल्हा पोलीस अधीक्षक सुवेज हक उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिवनेरी गडावर आगमन झाल्यावर त्यांनी शिवजन्मोत्सव स्थळी भेट दिली. त्याठिकाणी पाच सुवासिनींनी सजविलेल्या पाळण्यात बाल शिवाजींच्या मुर्तीला जोजवून पाळणा गीत म्हटले. त्यानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी शिवछत्रपतींची पालखी घेवून पालखीतील शिवछत्रपतींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर गडावर असणाऱ्या मंदिरातील राजमाता जिजाऊ आणि बाल शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन केले. 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त प्रशासनाच्यावतीने शिवनेरी गडावर मोठी तयारी करण्यात आली होती. यावेळी गडावर साहसी खेळांचे प्रात्यक्षिके पार पडली. शिवनेरी गडावर राज्यभरातून शिवप्रेमींची उपस्थिती होती.
00000

No comments:

Post a Comment