Sunday, 18 February 2018

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मुंबईत आगमन

मुंबई, दि. 18 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाईदलाच्या खास विमानाने आगमन झाले. त्यांच्या समवेत केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय  राज्यमंत्री रामदास आठवले, शिक्षण मंत्री विनोद तावडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, खासदार रावसाहेब दानवे, आमदार आशिष शेलार मुख्य सचिव सुमित मल्लीक यांनी पुष्पगुच्छ देवून प्रधानमंत्री यांचे स्वागत केले.
यावेळी राज्याचे मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजगोपाल देवरा तसेच तिनही दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर उपस्थित होते.
0000

No comments:

Post a Comment