नागपूर, दि.15 : वित्त व
नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार, दिनांक 16
फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा विभागीय आयुक्त
कार्यालयात येथे घेण्यात येणार आहे.
आढावा बैठकीत नागपूर
विभागातील जिल्ह्याचा आराखडा तयार करुन त्यास मंजुरी देण्यात येणार आहे. यावेळी
दुपारी 12.00 वाजता गडचिरोली जिल्हा, दुपारी 12.45 वाजता गोंदिया जिल्हा, दुपारी
1.30 वाजता भंडारा जिल्हा, दुपारी 3.00 वाजता चंद्रपूर जिल्हा, सायंकाळी 4.00
वाजता वर्धा जिल्हा तसेच सायंकाळी 5.00 वाजता नागपूर जिल्ह्याची आढावा बैठक
घेण्यात येणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी योजनांच्या सविस्तर माहितीसह बैठकीला
उपस्थित राहण्याच्या सूचना विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी दिल्या आहेत.
*****
No comments:
Post a Comment