मराठी भाषा गौरव
दिनानिमित्त आज विधानसभेत अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला.
मराठी भाषा अधिक लोकाभिमुख होऊन ती ज्ञानभाषा व्हावी यासाठी शासनाने मराठी
भाषेच्या विकास प्रक्रियेस अधिक चालना द्यावी, अशी शिफारस करीत विधानसभा अध्यक्षांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. तो एकमताने
संमत करण्यात आला. विधीमंडळाचे अधिवेशन व मराठी भाषा गौरव दिन हा एक योगायोग आहे. मराठी
भाषा समृद्ध करण्यासाठी आणि या भाषेच्या संवर्धनासाठी अविरतपणे योगदान देणाऱ्या
सर्व साहित्यिकांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो, असे श्री.बागडे यांनी यावेळी
सांगितले.
०००
No comments:
Post a Comment