मुंबई दि. 27 :
जालना जिल्ह्यातील परतुर, मंठा,जालना या 176 गावांच्या ग्रीड पाणीपुरवठा योजनेचे
काम नियोजित वेळेत पूर्ण करा, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता
मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज दिले.
परतुर वॉटर ग्रीडमधील पाणीपुरवठा योजनांच्या
कामाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी परतुर वॉटरग्रीड योजनेचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये विहिरी, जलकुंभ,ॲटोमेटंशन
व इलेक्ट्रिकल यासह बाबनिहाय कामाचा आढावा त्यांनी
घेतला. कामाचे साप्ताहिक व सूक्ष्म नियोजन करून
जीवन प्राधिकरणाने विहीत मुदतीत हे काम करावे.
काम करताना कामाचा दर्जा व गुणवत्ता कायम ठेवावा अशा
सूचना त्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
लातुर जिल्हा पाणीपुरवठा योजनेतील 84 पूर्ण
योजनांच्या सद्यस्थितीचा आढावा घेवुन त्यांचा अहवाल स्थानिक लोकप्रतिनिधींना
देण्याचे निर्देश त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन ईटनकर यांना दिले.‘मुख्यमंत्री पेयजल’ योजनेच्या दुस-या
टप्प्यातील 246 योजनेचे कार्यादेश काढून कामे तातडीने सुरू करावीत. मार्चअखेर उपलब्ध असलेला 98 लक्ष निधी खर्च
करावा.
केंद्राकडील 121 कोटीचा राज्याचा निधी मिळण्यासाठी
काही जिल्हा परिषदेकडील खर्चाची प्रमाणपत्रे प्रलंबित आहेत. ती तातडीने सादर करावीत
जेणेकरून ती केंद्राकडे पाठवता येतील. लातुर पाणीपुरवठा योजनेच्या बैठकीला कौशल्य
विकास मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, आमदार विनायकराव पाटील,आमदार
सुधाकरराव भालेराव उपस्थित होते.
००००
No comments:
Post a Comment