Thursday, 1 March 2018

शासकीय आदिवासी मुलांच्या वसतीगृहातील रॅगींग प्रकरणी गृहपालाला कारणे दाखवा नोटीस



·         आदिवासी विकास विभागाचा खुलासा
·         आठ विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द
·         प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती गठीत

      नागपूर, दि.1 :  एकात्मिक आदिवासी विकास विभागाच्या कुकडे लेआऊट येथील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतीगृहात झालेल्या विद्यार्थ्यांच्या रॅगींगचे नावावर मारहाण प्रकरणी विभागाने गंभीर दखल घेतली असून वसतीगृहातील गृहपाल यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असल्याचा खुलासा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी डिगांबर चव्हाण यांनी केला आहे.
            कुकडे लेआऊट येथील शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृहात बी.ए.एम.एस. द्वितीय वर्षातील विष्णू भारत पवार या विद्यार्थ्याला रॅगींगचे नावावर मारहाण प्रकरणामधील आठ विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात आले आहे. तसेच वसतीगृहाचे गृहपाल यांनासुध्दा कारणे दाखवा नोटीस देण्यात आली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याबाबत समिती गठीत करण्यात आलेली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त होताच पुढील उचित कार्यवाही तात्काळ करण्यात येईल, असा खुलासा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी डिगांबर चव्हाण यांनी केला आहे.
00000000


No comments:

Post a Comment