Thursday, 1 March 2018

शस्त्र परवानाधारकांनी युआयएन क्रमांक 10 मार्चपूर्वी प्राप्त करुन घ्यावा

     नागपूर, दि.1 :   ग्रामीण क्षेत्रातील शस्त्र परवानाधारक यांनी शस्त्र परवाना युआयएन क्रमांक प्राप्त करणे आवश्यक आहे. ज्यांना अद्यापपर्यंत हा क्रमांक प्राप्त झाला नाही, त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह शाखेतून 10 मार्च पूर्वी युआयएन क्रमांक प्राप्त करुन घ्यावा, अशा सूचना अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी प्रकाश पाटील यांनी दिल्या आहेत.
            युआयएन क्रमांक प्राप्त करण्यासाठी नागपूर शहरामधील शस्त्र परवानाधारक वगळता ज्यांना प्राप्त झालेला नाही त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह शाखेत हा क्रमांक घेणे आवश्यक आहे. हा क्रमांक नसेल तर शस्त्र परवाण्याचे नुतनीकरण होणार नाही, असेही अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी प्रकाश पाटील यांनी कळविले आहे.
00000000

No comments:

Post a Comment