Thursday, 1 March 2018

“जय महाराष्ट्र”मध्ये महसूल विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी “शून्य प्रलंबितता व दैनिक निर्गती”या विषयावर मुलाखत

 मुंबई, दि.०१ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्रकार्यक्रमात शून्य प्रलंबितता व दैनिक निर्गतीया विषयावर पुणेचे  महसूल विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत शुक्रवार दिनांक २ मार्च रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून संध्याकाळी ७.३० वाजता प्रसारित होणार आहे. निवेदिका रुपलक्ष्मी चौगुले शिंदे व निवेदक धर्मेंद्र पवार यांनी ही मुलाखत घेतली आहे.
शून्य प्रलंबितता व दैनिक निर्गतीअर्थात स्वच्छ व तत्पर कार्यालय या उपक्रमाची रचना, कार्यपद्धती व पार्श्वभूमी, उपक्रमाचे  नियंत्रण आणि आढावा,या उपक्रमाबद्दल पुणे विभागातील शासकीय कार्यालयांचा प्रतिसाद, या मोहिमेसाठी करण्यात आलेला संगणकीय प्रणालीचा वापर,ऑनलाइन टपाल ट्रॅकिंग सिस्टीम, शून्य प्रलंबितता व दैनिक निर्गतीहा उपक्रम लोकाभिमुख व गतिमान प्रशासनासाठी कशाप्रकारे फायदेशीर ठरते आहे याबाबत सविस्तर माहिती श्री दळवी यांनी जय महाराष्ट्रकार्यक्रमातून दिली आहे.
0000

No comments:

Post a Comment