मुंबई, दि. 19 : राज्यात राज्य कंत्राटी कामगार
सल्लागार मंडळाचे गठन करण्यात आल्याची माहिती कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर
यांनी विधानपरिषद व विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.
यासंदर्भात माहिती देताना श्री. निलंगेकर म्हणाले,
कंत्राटी कामगार (नियमन व निर्मुलन) अधिनियम नुसार राज्य शासनाला सल्ला
देण्याकरिता हे मंडळ काम करेल. त्यामध्ये अध्यक्ष, पदसिद्ध सचिव आणि 11 सदस्यांचा
समावेश आहे. त्यात शासनाचे एक प्रतिनिधी, मालक प्रतिनिधी तीन, कंत्राटदार
प्रतिनिधी दोन, व कामगार प्रतिनिधी पाच यांचा समावेश असणार आहे.
००००
No comments:
Post a Comment