मुंबई दि. १७: वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली काल औद्योगिक संस्था आणि अशासकीय संस्थांमार्फत अवनत वनक्षेत्रावर करावयाच्या वनीकरणासंदर्भातील ४ त्रिपक्षीय करारांना मान्यता देण्यात आली. या चार संस्थांमार्फत ९७ हेक्टर क्षेत्रावर वनीकरण केले जाणार असून या त्रिपक्षीय कराराचा कालावधी सात वर्षांचा राहणार आहे.
वनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या उच्चाधिकार समितीच्या बैठकीस वन सचिव विकास खारगे यांच्यासह इतर वरिष्ठ शासकीय अधिकारी तसेच संबंधित औद्योगिक तसेच अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मान्यता मिळालेल्या त्रिपक्षीय करारांमध्ये मे. सॅमसोनाईट साऊथ एशिया प्रा. लि. गोंदे, नाशिक, मे.टैनवाला फाऊंडेशन, मुंबई, मे. ठाणे बेलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन, रबाळे, नवी मुंबई, मे. ए.के.रुरल डेव्हलपमेंट ट्रस्ट कळवा, जि. ठाणे, मे. दीपक फर्टिलायझर्स ॲण्ड पेट्रोकेमिकल्स कार्पोरेशन लि. तळोजा, ता. पनवेल , जि. रायगड, ग्रींड मास्टर मशिन्स प्रा. लि. औरंगाबाद, दि. सेंटर फॉर अप्लाईड रिसर्च ॲण्ड पिपल ऐंगेजमेंट - औरंगाबाद या संस्थांचा समावेश आहे. या संस्थांच्यावतीने १ लाख ३५ हजार ७५० रोपांची लागवड २०१८-१९ च्या पावसाळी हंगामात करण्यात येणार असल्याची माहिती ही बैठकीत देण्यात आली.
0 0 0
No comments:
Post a Comment