मुंबई, दि. 19 :राज्यात जात प्रमाणपत्र असलेल्या कोणत्याही व्यक्तीस जात
पडताळणीसाठी अर्ज करता येईल, अशी महत्वपूर्ण माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री
दिलीप कांबळे यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.
श्री. कांबळे म्हणाले, यापूर्वी निवडाणूकीसाठी अर्ज करतांना किंवा महाविद्यालयीन शिक्षणासाठी
अर्ज करताना जात पडताळणी करण्यासाठी अर्ज करण्याची आवश्यकता होती. आता कोणत्याही
व्यक्तीने जात पडताळणीसाठी अर्ज केल्यास त्यास पडताळणी प्रमाणपत्र मिळू शकणार आहे.
हे प्रमाणपत्र जारी करतांना शैक्षणिक कार्यासाठी आणि निवडणूक कार्यासाठी अर्ज
केलेल्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
राज्यातील
36 जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांपैकी 18 समित्यांच्या अध्यक्ष पदावर नियमित
अधिकारी कार्यरत असून उर्वरित जिल्ह्यांसाठीच्या अध्यक्षपदाची पदे येत्या दोन
महिन्यात भरले जातील. सध्या रिक्त असलेल्या पदांचा अतिरिक्त कार्यभार अन्य
अधिका-यांकडे सोपविण्यात आला असून समित्यांचे कामकाज सुरळीत सुरू आहे. प्रलंबित
असलेली प्रकरणे तातडीने निकालात काढण्यात येणार आहेत, असेही श्री. कांबळे यांनी
सांगितले.
जातपडताळणी
संदर्भात 24 नोव्हेंबर 2017 रोजी काढण्यात आलेल्या महत्वपूर्ण अधिसूचनेवर आधारित
परिपत्रक जारी झाले असून या नुसार कुटुंबातील एका व्यक्तीची जात पडताळणी झालेली
असल्यास त्याच्या पाल्यांना व रक्ताच्या नात्यातील व्यक्तींना पडताळणी प्रमाणपत्र
एका अर्जाच्या आधारावर घेता येणार आहे.अशी
माहिती याचर्चेतील एका उपप्रश्नाला उत्तर देताना सामाजिक न्यायमंत्री राजकुमार
बडोले यांनी दिली. तर अनुसूचित जमातीच्या अर्जदारांना हा निर्णय सध्या लागू
नसल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
उपरोक्त
विषयाच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री सतिश चव्हाण, सुनिल तटकरे, भाई
गिरकर, विक्रम काळे, अमरसिंह पंडीत
आदिंनी सहभाग घेतला होता.
००००
No comments:
Post a Comment