मुंबई, दि.19 :सामाजिक न्याय विभागामार्फत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात
येणा-या अनुदानित वसतीगृहांमधिल विद्यार्थ्यांसाठी दिले जाणारे अनुदान
वाढविण्यासंदर्भात शासन सकारात्मक असून याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे
सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या
तासाला सांगितले.
राज्यात
काही वसतीगृहांकडे मान्यता नसतानाही वसतीगृहे अनुदान घेत असल्याचे आढळून आल्याने
या वसतीगृहांची तपासणी करण्याचा निर्णय
घेण्यात आला असे सामाजिक न्याय
राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी या चर्चेतील एका उपप्रश्नाला उत्तर देतांना
सांगितले .
वसतीगृहांच्या
परिपोषण अनुदानासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. या विषयाच्या अनुषंगाने
सदस्य सर्वश्री हेमंत टकले, सुनिल तटकरे
आदिंनी प्रश्न उपस्थित केला होता.
००००
No comments:
Post a Comment