मुंबई, दि.19:चिपळूण तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांचे
श्रेणीसुधार करण्यात येईल. प्रस्ताव प्राप्त झाल्यास संबंधित रस्त्याच्या कामासाठी
निधी उपलब्ध करून देऊ, अशी माहिती महसूल
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत दिली.
यासंदर्भात सदस्य भास्कर जाधव यांनी प्रश्न उपस्थित
केला होता.
श्री. पाटील म्हणाले की, संगमेश्वर ते पेडांबे गाव आणि संबंधित
गावांतील रस्त्यासंदर्भात कामे सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग करून घेण्याबाबत
विचार करण्यात येईल. ग्रामीण रस्ते महत्वाचे असून, त्यासंदर्भातील
प्रस्ताव श्रेणीसुधार करून निधी उपलब्ध करण्यात येईल, असे
श्री. पाटील यांनी सांगितले. वहाळ-शिरंबे-वीर बंदर या मार्गावरील भागात
संरक्षणभिंत बांधणे व मो-या सुधारणेचे काम मंजूर असून, सदर
काम निविदा स्तरावर आहे. निविदा निश्चीत करून लवकरच कामे सुरू करण्यात येणार
असल्याची माहिती श्री. पाटील यांनी यावेळीदिली.
००००
No comments:
Post a Comment