मुंबई, दि. 19 : राज्यातील सर्व माथाडी मंडळांमध्ये
सुसूत्रता ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्र माथाडी, हमला आणि इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियमामध्ये
आवश्यक त्या सुधारणा करण्यासाठी राज्यस्तरावर एकच माथाडी मंडळ गठित करण्यासाठी
अभ्यास गटाची नियुक्ती करण्यात आली आहे.
या अभ्यासगटामध्ये विधानसभा सदस्य तथा महाराष्ट्र
राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि
जनरल कामगार युनियनचे कार्याध्यक्ष शशिकांत शिेंदे, विधानपरिषद
सदस्य तथा महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे
सरचिटणीस नरेंद्र पाटील, भारतीय जनात कामगार संघाचे अध्यक्ष
शिवाजी पाटील यांचा समावेश आहे.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर
उपलब्ध आहे.
००००
No comments:
Post a Comment