Thursday, 26 April 2018

विधानपरिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक तक्रारींसाठी मंत्रालयात नियंत्रण कक्ष सुरु


            मुंबई, दि. 26 : विधानपरिषदेच्या सहा स्थानिक प्राधिकारी मतदार संघाची द्विवार्षिक निवडणूक 2018 जाहीर झाली असून मतदान 21 मे, 2018 रोजी होणार आहे. या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होण्याचा दिनांक 29 मे, 2018 आहे. या निवडणुकीसंदर्भात तक्रार दाखल करण्यारिता मंत्रालयात 24 तास नियंत्रण कक्ष प्रस्थापित करण्यात आला आहे.
            या निवडणूकीची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून म्हणजेच 26 एप्रिल, 2018 ते 29 मे, 2018 पर्यंत कक्ष क्र. 611, निवडणूक शाखा, सामान्य प्रशासन विभाग, 6वा मजला, मंत्रालय विस्तार इमारत, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-32, येथे नियंत्रण कक्ष 24x7 तत्वावर प्रस्थापित करण्यात आला आहे. निवडणुकी संदर्भात तक्रार सादर करावयाची असल्यास ती उपरोक्त नियंत्रण कक्षात दूरध्वनी क्र.022-22026441, मोबाईल क्र.9619204746 या क्रमांकावर तक्रार करावी, असे उप सचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारीयांनी कळविले आहे.
००००

No comments:

Post a Comment