नवी दिल्ली, 5 : ज्येष्ठ लेखक वसंत वसंत लिमये आणि मानोसोपचार तज्ञ आणि लेखक डॉ. आनंद
नाडकर्णी या दोन लेखकांनी गप्पातून एकमेकांच्या
लेखनाचा प्रवास उलगडला.
पुढचे पाऊल आणि महाराष्ट्र शासन यांच्या सयुंक्त विद्यमाने महाराष्ट्र सदन
येथे महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने महाराष्ट्र महोत्सव “जागर
महाराष्ट्र दिनाचा”या दोन दिवसीय
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आज पहिल्या दिवशीच्या चौथ्या सत्रात लेखक
वसंत वसंत लिमये आणि मानोसोपचार तज्ञ तसेच लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांनी
एकमेकांच्या गप्पातून लेखनाचा प्रवास उलगडला.
दोन्ही लेखक आपापल्या क्षेत्रातील मातब्बर असून तेवढीच पकड
त्यांची लेखनातही आहे. दोन्ही लेखक कॉलेजपासून एकमेंकाना ओळखतात त्यामुळे हे सत्र
मुलाखतीतून औपचारिक गप्पांमध्ये रुपांतरीत
झाले. डॉ. लिमये यांनी अनेक क्षेत्रात काम केले असून लेखनाची आवड हे ध्यासच
झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. लिमये यांची ‘लॉक ब्रिफ्रिंग’ आणि ‘विश्वस्त’ या कांदबरी साहसी आहेत. त्यांचे क्षेत्र
गिर्यारोहणाशी संबधीत होते त्यातही जेवढीच साहसीकता असते तेवढीच उत्सुकता ही कांदबरी वाचतानाही मिळते. ‘लॉक ब्रिफ्रिंग’ कांदबरीवरी लिहीण्यापुर्वी त्यावर
संशोधन करण्यासाठी किमान साडेचार वर्षे लागली तर लिहायला किमान दिड वर्ष असा हा
साडे पाच वर्षांचा प्रवास होता. विश्वस्त लिहायला साडेचार वर्षे लागली त्यासाठी
अमेरिकेला प्रत्यक्ष जाऊन संदर्भ गोळा
केले. वाचताना वाचक कांदबरीशी एकरूप होऊन जातो. विश्वस्ताची संपूर्ण कथा डोक्यात
होती. त्यामुळे सुरुवातीपासून तर शेवट पर्यंत सलग न लिहीता तुकडयात कांदबरी लिहिली
असल्याचे श्री. लिमये यांनी सांगीतले. लेखनाचा हा प्रवास 1989 च्या काळापासून सरु
झाल्याचे सांगितले. पर्यटनाची आवड असल्यामुळे त्यावेळीच्या महानगर या दैनिकात
धुंद-स्वच्छंद ही लेख मालिका लिहिली नंतर या लेख मालिकेचे ग्रंथाली ने पुस्तकाच्या
रूपात प्रकाशित केले. श्री. लिमये हे सध्या पुढच्या साहसी कांदबरीसाठी हिमालयात
जात असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ मानोसोपचार तज्ञ तसेच
लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांनी मानोसोपचार
या विषयावर अनेक पुस्तके लिहून जीवन जगण्यासाठी नवी दिशा दिली. तसेच त्यांची वेध
नामक संस्था महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात संस्कार शिबिर वर्ग घेऊन जीवनात
सकारात्क दृष्टकोण राबविण्याविषयी प्रशिक्षण देते. यासह मुक्तागंण या व्यसनमुक्ती
संस्थाच्या स्थापनेपासून ते या संस्थेशी जुळलेले आहेत. त्यांनी गप्पांमधून लेखनाचा
प्रवास उलगडला. मानोसोपचार तज्ञ नसतो झालो तर लेखक मात्र नक्की झालो असतो. लेखन हे
ध्येयाशी जोडले गेले आणि मानसिक आरोग्य आणि लेखन यांची सांगड घालण्याची संधी
मिळाली. लेखनसाठी वेगळा वेळ काढावा लागत नाही. कधीही आणि कुठेही लिहायला आवडत
असल्याचे डॉ. नाडकर्णी म्हणाले.
यावेळी वसंत लिमये यांची विश्वस्त या कांदबरीवर आधारित
संगणकीय सादरीकरण दाखविण्यात आले. तर डॉ. नाडकर्णी यांनी स्वलिखीत हिंदी गीत ‘बाहर से सारे लागे न्यारा……. ’ हे गीत सादर केले.
0000000000
No comments:
Post a Comment