‘जीवनरक्षा पदक’पुरस्काराने सन्मानित
नागपूर,दि. 06 : स्वत:च्या जीवाची पर्वा न करता दोन मुलांना जीवदान देण्याचे
मोलाचे काम जलतरणपटू प्रभाकर साठे यांनी केले. त्यांचे कार्य नवयुवकांसाठी प्रेरणादायक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आंतरराष्ट्रीय जलतरणपटू प्रभाकर
साठे यांना आज जीवनरक्षा पदक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी ते बोलत
होते. याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, निवासी जिल्हाधिकारी रविंद्र खजांजी, उपजिल्हाधिकारी
मनीषा जायभाये उपस्थित होते.
शासकीय ग्रंथालयात ते ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथालय संचालक,
हस्तालिखीत अधिकारी, विभागीय ग्रंथपाल,
या विविध पदावर त्यांनी 35 वर्ष कार्य केले.
प्रत्येक ग्रंथालयात काम करीत असताना वाचाल तर वाचाल आणि पोहाल तर वाचाल याविषयी
त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 1965-66 या वर्षात
नागपूर विद्यापीठाच्या उकृष्ट जलतरण व सूरपटूचा सन्मानही त्यांनी प्राप्त केला.
जिल्हा ते आंतरराष्ट्रीय नागरी सेवा जलतरण सूर स्पर्धा, ‘फिना’ विश्व मास्टर्स जलतरण सूर
स्पर्धेत गोटेनबर्ग- स्वीडन 2010, रिमिनी – इटली 2012, मॉट्रियाल, कॅनडा 2014, कझान –
रशिया 2015, येथील स्पर्धेत सहभागी होवून
यामध्ये त्यांना सुवर्ण 150, रौप्य 55, तर 32 कांस्य अशी एकूण 237 पदके
त्यांनी मिळविली आहेत.
31 मे 2016 रोजी अंबाझरी तलावात त्यांनी
प्रसंगावधान दाखवून कु. अन्नु लाला मोगरे व राकेश सुरेंद्र मानकर या दोन मुलांचे
प्राण वाचविले. या धाडसी कार्याकरिता केंद्र शासनाच्या गृह विभागातर्फे एक लाख
रुपयांचा धनादेश, जीवनरक्षा पदक प्रमाणपत्र देऊन त्यांना
सन्मानित करण्यात आले.
*****
No comments:
Post a Comment