Friday, 6 July 2018

अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे - जिल्हाधिकाऱ्यांचे जनतेला आवाहन

आज शाळांना तसेच महाविद्यालयांना सुटी जाहीर
         नागपूरदि. 06 : नागपूर जिल्ह्यात सतत अतिवृष्टी सुरु असून वेध शाळेने चोवीस तास अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने सतर्क राहावे, तसेच शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या  दृष्टीने शाळा प्रशासनाने योग्य दखल घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी जनतेला केले आहे.
            अतिवृष्टीमुळे शाळांना तसेच महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्याच्या सूचना देताना ‍जिल्हा प्रशासनातर्फे आवश्यक उपाययोजना करण्यात येत असून नागरिकांनी सतत होणाऱ्या पावसात अत्यावश्यक कारणांशिवाय घराच्या बाहेर पडू नये. शहरातील विविध वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी साचले असून वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांनी चारचाकी अथवा दुचाकी वाहने पाणी साचलेल्या भागातून चालवू नये. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जनतेने जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे.
****
                                                  
                  

No comments:

Post a Comment