Friday, 6 July 2018

नागपूर विभागात सरासरी 35.92 मिमी पाऊस


उमरेड तालुक्यात सर्वाधिक 178.20 मिमी अतिवृष्टी 

          नागपूर दि.06 : नागपूर विभागात गेल्या चोवीस तासात सरासरी 35.92 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात 178.20 मि.मी. इतकी अतिवृष्टी झाली आहे तसेच भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात 114.80 मि.मी.नागपूर जिल्ह्यातील मौदा  तालुक्यात 111.20, भिवापूर तालुक्यात 111.00 मि.मी.कुही तालुक्यात 80.20मि.मी.तर चंद्रपुर  जिल्ह्यातील नागभिंड तालुक्यात 68.00 मि.मी.ब्रम्हपूरी तालुक्यात 67.80 मि.मी.भद्रावती तालुक्यात 67.00 मि.मी. पावसाची नोंद घेण्यात आली.
            विभागात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला जिल्हानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी जूनपासून आजवर झालेल्या पावसाची आहे.
           नागपूर 55.68 (294.31), चंद्रपूर 42.84 (313.04), भंडारा 40.79 (268.00), गडचिरोली 30.89 (326.76), वर्धा 28.73 (199.74) तर गोंदिया जिल्ह्यात सर्वात कमी16.60 (250.13) पाऊस पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहेत.
            नागपूर विभागात दिनांक जून 2018 ते जुलै 2018 पर्यत सरासरी 275.33 मिलीमीटर पाऊस पडला आहे.
*****

No comments:

Post a Comment