नागपूर, दि. 29 : शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ‘स्क्रब
टायफस’ पीडित रुग्णांची आस्थेवाईकपणे चौकशी करण्यासाठी
आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत यांनी आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास
भेट दिली.
यावेळी आरोग्य
विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, शासकीय वैद्यकीय
महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे, वैद्यकीय
अधीक्षक डॉ. राजेश गोसावी, सहायक वैद्यकीय अधीक्षक डॉ. निलेश
अग्रवाल, डॉ. गिरीश भुयाल, उप वैद्यकीय
अधीक्षक डॉ. शिल्पा लांजेवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. मुरारी
सिंग, अतिदक्षता विभागाच्या प्रमुख डॉ. अर्चना अहेर आदी
उपस्थित होते.
आरोग्य मंत्री
डॉ. दिपक सावंत यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अतिदक्षता
विभागात उपचारार्थ दाखल करण्यात आलेल्या ‘स्क्रब टायफस’ पीडित रुग्णांची भेट रुग्णांच्या नातेवाईकांची विचारणा केली. त्याचबरोबर
रुग्णांच्या उपचारार्थ आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येतील,
असेही त्यांनी यावेळी सांगितले. भेटी दरम्यान अधिष्ठाता डॉ.
अभिमन्यू निसवाडे यांनी रुग्णालयात स्क्रब टायफससह डेंगू, स्वाईन
फ्ल्यु अशा विविध आजारावर उपचाराकरिता उपलब्ध सुविधांची मंत्री डॉ. सावंत यांना
माहिती दिली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात स्क्रब
टायफसच्या एकूण 22 रुग्णांना उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.
त्यापैकी चार रुग्णांवर पूर्ण उपचार केल्यानंतर त्यांना सुट्टी देण्यात आली असून 12
रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.
*****
No comments:
Post a Comment