Wednesday, 29 August 2018

खाजगीरित्या प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना सूचना



नागपूर,दि.29 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालांत इयत्ता 10 वी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसाठी खाजगीरित्या प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फार्म नंबर 17 नावनोंदणी अर्ज ऑनलाईन प्रक्रियेमध्‍ये मुदतवाढ देण्यात आली आहे.
        विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, मंगळवार दिनांक 11 सप्टेंबर 2018 पर्यंत विहित शुल्क व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क, किंवा शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयात जमा करावे. तसेच शनिवार 15 सप्टेंबर पर्यंत मूळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळाकडे जमा करावी. 10 वीच्या विद्यार्थ्यांनीhttp://form17.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर अर्ज करावा. 12 वीच्या विद्यार्थ्यांनी http://form 17.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावरुन अर्ज करावा. ऑफलाईन अर्ज स्विकारल्या जाणार नाही. विद्यार्थ्यांसाठी असलेली माहिती  व सूचना संकेतस्थळावर मराठी व इंग्रजी भाषेत  उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करताना कोणतीही अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत 020-25705208/25676405/25705271 या दूरध्वनी क्रमाकांशी संपर्क साधावा. असे आवहन नागपूर विभागीय मंडळाकडून करण्यात आले आहे.
*****

No comments:

Post a Comment