नागपूर, दि. 4 : विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी केल्या जाते. परंतु यावेळी सोमवार, दिनांक 10 सप्टेंबर 2018 रोजी नागपूर जिल्ह्यासाठी तान्हा पोळानिमित्त स्थानिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे विभागीय लोकशाही दिन सोमवार ऐवजी मंगळवार, दिनांक 11 सप्टेंबर 2018 रोजी आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विभागीय आयुक्त संजीव कुमार हे जनतेच्या तक्रारी व गाऱ्हाणी ऐकतील.
तक्रारकर्त्यांनी जिल्हास्तरावरील लोकशाही दिनात दिलेल्या निवेदनाची प्रत, लोकशाही दिनाच्या टोकनाची प्रत तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या उत्तराची प्रत या सर्व प्रतींचे स्वतंत्र दोन संच घेऊन सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत स्वत: उपस्थित रहावे.
*****
No comments:
Post a Comment