मुंबई, दि. ११ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात राष्ट्रीय पोषण महिन्यानिमित्त एकात्मिक बाल विकास योजनेच्या
आयुक्त इंद्रा मालो यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. राज्यातील आकाशवाणीच्या
सर्व केंद्रांवरून बुधवार दि. १२ आणि गुरूवार दि. १३ सप्टेंबर रोजी सकाळी ७.२५ ते
७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका श्रीमती मनाली दीक्षित यांनी ही
मुलाखत घेतली आहे.
शासनाद्वारे १ सप्टेंबरपासून राबविण्यात
येणारा राष्ट्रीय पोषण महिना, एकात्मिक बाल विकास आयुक्तालयाचे प्रमुख
उद्देश, आयसीडीएसच्या माध्यमातून माता आणि बालकांना देण्यात येणाऱ्या सुविधा तसेच
पुरविण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांचा दर्जा, अस्वच्छता आणि
बालविवाहामुळे येणारे कुपोषण, गरोदर व स्तनदा मातांनी घ्यावयाची काळजी, स्तनपानाचे महत्व, कुपोषणाच्या मुक्तिसाठी प्रशासनाद्वारे अंमलात
आणलेल्या उपाययोजना, बालकांचे पोषण आहार तसेच लसीकरणाचे महत्व या
विषयांची माहिती श्रीमती मालो यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.
0000

No comments:
Post a Comment