आरोग्यमंत्री
डॉ. दीपक सावंत यांनी तातडीने घेतली बैठक
यावेळी
आरोग्यमंत्र्यांनी स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू, आदी साथीच्या आजारांचा आढावा घेतला. राज्यात सध्या 892
स्वाईन फ्लू चे रुग्ण आहेत. 88 रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यात नाशिक व पुणे
विभागातील रुग्णांची संख्या जास्त आहे. 1 जानेवारी ते 25 सप्टेंबर या कालावधीत 15
लाख 61 हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली असून 23 हजार 905 संशयित रुग्णांना
ऑसेलटॅमीवीर गोळ्या देण्यात आल्या आहेत. 892 बाधित रुग्णांपैकी रुग्णालयात 337
रुग्णांवर उपचार सुरु असून 463 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. पुणे महापालिका
क्षेत्रात 44 तर नागपूर येथे तीन रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत. राज्यात नाशिक विभागात
26, पिंपरी चिंचवड मनपा
क्षेत्रात 18,
अहमदनगर
8, पुणे मनपा क्षेत्रात
7, सातारा व ग्रामीण
क्षेत्रात प्रत्येकी 6, सोलापूर 3, अकोला, नागपूर, चंद्रपूर, जळगाव प्रत्येकी 2, कोल्हापूर, वाशिम, उस्मानाबाद, बुलढाणा आणि मीर
भाईंदर येथे प्रत्येकी एक अशा एकूण 87 रुग्णांचा मृत्यू झाला असून इतर राज्यातील
एक रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
स्वाईन फ्लूचा
प्रार्दुभाव मधल्या वयोगटातील व्यक्तींना जाणवत आहे. स्वाईन फ्लूचा व्हायरसमध्ये
बदल झाला नसून त्यावरील उपचारात होत असलेल्या विलंबामुळे मृतांच्या संख्येत वाढ
झाल्याचा निष्कर्ष डेथ ऑडिट समितीने काढला असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्यातील नाशिक, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर, सातारा या भागात
ऑसेलटॅमीवीर गोळ्याची उपलब्धता सर्व औषध दुकानांमध्ये व्हावी तसेच या दुकानांमधून
किती प्रमाणावर या गोळ्यांची विक्री झाली या संदर्भात अन्न व औषध प्रशासनाने अहवाल
देण्याबाबत आरोग्यमंत्र्यांनी निर्देश दिले.
राज्यातील खासगी
प्रॅक्टीस करणाऱ्या डॉक्टरांनी सर्दी, तापाच्या रुग्णांवर उपचार केल्यानंतर एका दिवसात
लक्षणे कमी झाली नाहीत तर अशा रुग्णांवर तातडीने ऑसेलटॅमीवीर गोळी देण्यात यावी.
यामध्ये कुठल्याही प्रकारे हलगर्जीपणा करू नये असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले.
राज्यातील सर्वच मेडीकल स्टेअर्समध्ये ऑसेलटॅमीवीरच्या गोळ्यांची उपलब्धता
असण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
स्वाईन फ्ल्यूच्या
ज्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत त्या त्या महापालिका क्षेत्रातील आरोग्य
अधिकाऱ्यांनी त्यावर सनियंत्रण ठेवावे. या आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी
महापालिका आयुक्तांनी आठवड्यातून एकदा आढावा बैठक घ्यावी, असे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी
सांगितले.
राज्यात 1 लाख 28
हजार व्यक्तींना स्वाईन फ्लू प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले असून रुग्णांचे नियमित
सर्वेक्षण केले जात आहे.
००००



No comments:
Post a Comment