नागपूर दि 27 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व नगर परिषद उमरेड यांच्या संयुक्त विद्यमाने बेरोजगार युवक युवतीसाठी रोजगार नोकरभरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळावा शनिवार 29 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजतापंडित दीनदयाल उपाध्याय नाटय सभागृह मंगळवारी पेठ, उमरेड येथे आयोजित करण्यात आला आहे.
मेळाव्याला उद्योजक कंपनी बेरोजगार युवक युवती तसेच 10 व 12 वी उत्तीर्ण ते पदवीधर, अभियांत्रिकी डिप्लोमा, बी. फार्म, टेक्नीकल नॉन टेक्नीकल आय.टी. आय सी.एन. सी. फीटर, वेल्डर, इलेक्ट्रीशयन बी.ई. इलेक्ट्रॉनिक ॲटोमोबाईल, बी.टेक फुड टेक्नोलॉजी बी.एससी. माइक्रोबॉयलॉजी इत्यादी पात्र बेरोजगारांनी शैक्षणिक प्रमाणपत्रासह स्वखर्चाने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक प्र.वा. खंडारे यांनी केले आहे.
***
No comments:
Post a Comment