मुंबई, दि. 4 : ग्रंथालय
संचालनालयामार्फत सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांना ग्रंथालय शास्त्राचे
प्रशिक्षण देऊन जून 2018 मध्ये घेण्यात आलेल्या ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षेचा
निकाल जाहीर झाला आहे.
राज्यातील 29 जिल्हास्तरीय केंद्रामधून एकूण 1
हजार 177 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 860 विद्यार्थी उत्तीर्ण
आणि 317 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. या परीक्षेच्या निकालाची टक्केवारी 73.07
टक्के आहे. राज्यात सर्वाधिक निकाल गोंदिया केंद्राचा 97.56 टक्के असून सर्वांत
कमी सांगली केंद्राचा 36.36 टक्के निकाल आहे. तर विभागामध्ये अमरावती विभागाचा
सर्वाधिक 85.71 टक्के आणि औरंगाबाद विभागाचा सर्वांत कमी 67.75 टक्के निकाल लागला
आहे.
परीक्षेचा निकाल संचालनालयाच्या www.dol.maharashtra.gov.in
या
संकेतस्थळावर 1 सप्टेंबर पासून अपलोड करण्यात आला असून विदयार्थ्यांना गुणपत्रिका
त्यांच्या केंद्रावर 15 सप्टेंबर नंतर मिळणार आहेत.
ज्या विद्यार्थ्यांना प्राप्त गुणांबाबत फेर गुणमोजणी
करावयाची आहे,
त्यांनी
प्रत्येक विषयास प्रत्येकी दहा रुपये प्रमाणे शुल्क आणि अर्ज संबंधित वर्ग
व्यवस्थापकांकडे 25 सप्टेंबर पर्यंत पाठवावेत. वर्ग व्यवस्थापकांनी फेर गुणमोजणीचे
विद्यार्थ्यांचे अर्ज आणि चलनाची प्रत ग्रंथालय संचालनालयाकडे 5 ऑक्टोबर 2018
पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. यानंतरचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत असे प्र.
ग्रंथालय संचालक सुभाष राठोड यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे.
००००
No comments:
Post a Comment