राज्यातील पहिला अभिनव उपक्रम
नागपूर, दि.3 : अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवाविषयक महत्वाचा दस्ताऐवज असलेला सर्विसबुक. नियुक्तीपासून तर सेवानिवृत्तीपर्यंत सर्व नोंदी या सेवाविषयक महत्त्वाच्या दस्ताऐवज असलेल्या सर्विसबुकमध्ये घेण्यात येतात. आपल्या सर्विसबुकमध्ये असेलेल्या सर्व नोंदीची माहिती ई सर्विसबुकमुळे सहज व सूलभपणे पाहता येणार आहे. सेवाविषयक माहिती मोबाईल ॲपच्या माध्यमातूनही हवी तेव्हा उपलब्ध होणार आहे.
मानवसंपदाअंतर्गत ई सर्विसबुक कार्यान्वित करणारी राज्यातील पहिली जिल्हा परिषद ठरली आहे. या उपक्रमासाठी प्रायोजिक तत्वावर नागपूर जिल्हा परिषदेची निवड झाली असून पहिल्या टप्प्यात वर्ग 3 व वर्ग 4 संवर्गातील सुमारे चार हजार कर्मचाऱ्यांचे दस्ताऐवज ई सर्विसबुकच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. येत्या 2 ऑक्टोबरपासून कर्मचाऱ्यांना आपला सेवाविषयक रेकार्ड आपल्या मोबाईलवर सुध्दा पाहता येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी संजय यादव यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागअंतर्गत जिल्हयातील शिक्षकासह सर्व कर्मचाऱ्यांचे सेवाविषयक रेकार्ड ई सर्विसबुकअंतर्गत करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेत एकूण 8 हजार 500 कर्मचारी कार्यरत आहे. ई सर्विसबुक कार्यान्वित झाल्यानंतर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सेवाविषयक बाबी ऑनलाईनवर उपलब्ध होणार आहे. यामध्ये रजा मंजूर, नामंजुरीची कार्यवाही, सेवा ज्येष्ठता याद्या, 12 व 24 वर्षाचे सेवेनंतर अनुज्ञेय लाभ, पद्दोन्ती, स्थानांतरण, सेवेत कायम करणे, सेवेत नियमित करणे आदी सर्व बाबी निर्धारीत वेळेत पूर्ण होणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यपालन अधिकारी श्रीमती प्रमिला जाखलेकर यांनी दिली.
प्रथम टप्प्यात वर्ग 3 व 4 संवर्गातील चार हजार कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबीची माहिती अद्यावत नोंदणीसह ऑनलाईन करण्यात आल्या आहेत.
0000000
No comments:
Post a Comment