Tuesday, 4 September 2018

श्री क्षेत्र भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत १५ कोटी रुपयांचा निधी - सुधीर मुनगंटीवार


            मुंबई दि. : ४-  श्रीक्षेत्र भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकास आराखडा १४८.३७ कोटी रुपयांचा असून या मंजूर आराखड्यातील सन २०१८-१९ या आर्थिक वर्षातील कामांसाठी १५ कोटी ४० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
            हा निधी जिल्हाधिकारी पुणे यांना उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा उपयोग पर्यटनावरील भांडवली खर्चासाठी (५३ मोठी बांधकामे)  करण्यात येईल. यासंबंधीचा शासननिर्णय नियोजन विभागाने दि. ३१ ऑगस्ट २०१८ रोजी निर्गमित केला असून त्याचा सांकेतांक- २०१८०८३११७४००१३२१६ असा आहे.
००००



No comments:

Post a Comment