Tuesday, 4 September 2018

'दिलखुलास' कार्यक्रमात वन विभागाचे सचिव विकास खारगे


         मुंबई, दि. ४ : माहिती  व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात ५० कोटी वृक्ष लागवड या विषयावर वन विभागाचे सचिव विकास खारगे यांची विशेष मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून उद्या बुधवार  दि. ५ आणि गुरूवार दि. ६ सप्टेंबर रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक शैलेश पेठे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
              दि. १ ते ३१ जुलै २०१८ या काळात वन विभागाने राज्यात केलेले वृक्ष लागवडीचे विशेष उपक्रम, महाराष्ट्रातील अत्यल्प वनक्षेत्र असलेल्या भागातील वनक्षेत्र वाढविण्यासाठी अंमलात आणलेल्या उपाय योजना, वन विभागाचा वृक्ष लागवडीचा महत्वाकांक्षी  कार्यक्रम,  वृक्ष लागवडीच्या यावर्षी  राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमात लोकसहभाग आणि प्रशासनाच्या समन्वयाबाबतची माहिती श्री. खारगे यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.
००००



No comments:

Post a Comment